संविधान वाचवायचे असेल तर मोदींचा पराभव करा ; कॉंग्रेस सेवादलाच्या शिबिरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १२
छत्रपती संभाजीनगर |: देशात मोदी सरकारने भारतीय संविधान धोक्यात आणल्याची टीका करत मोदींचा पराभव करायाचा असेल तर सर्वानी एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कुंभेफळ येथे आयोजित राज्यस्तरीय कॉंग्रेस सेवादलाच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात गुरुवारी (दि.१२) केले.
अनेक नेते मंडळी विविध संघटनाचे पदाधिकारी, मंडळे हे मोदी विरोधात असल्याचे चित्र भारत जोडो यात्रेतून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात मोदीं बाबत चा विरोध जनसामान्यांमध्ये दिसून येईल. कारण वाढती महागाई, ढासळत चाललेली लोकशाही याला कारणीभूत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. जी सगळी माणसं या यात्रेमध्येआ सहभागी झाले होते त्यांना कळून चुकलं की आज मोदींना थांबवणार असेल तर ती क्षमता फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे. असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक करतांना प्रदेशाध्यक्ष विलास औताडे म्हणाले की, देशामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत असून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे माणसे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे काम केले पाहिजे. सर्वांना एकत्र आणण्याचे काम आणि पक्षातील शिस्त अधिक बळकट करण्यासाठीच या तीन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर माजी आमदार केशवराव औताडे म्हणाले की, सेवा दलातील प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठता जोपासली पाहिजे, राहुल गांधी यांनी आपल्या कामातून विरोधकांची तोंडे बंद केली आहे. त्यांचा आदर्श आपण सर्वानी ठेवायला पाहिजे.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव लालजी मिश्रा, माजी आमदार रामहरी रूपनवर, कोन्ग्रेस सेवा दलाचे पश्चिम विभाग प्रभारी चंद्रप्रकाश वाजपेयी, सरचिटणीस अमर खानापूरकर, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार केशवराव औताडे, नामदेवराव पवार, माजी खासदार उत्तमसिंह पवार, मुजाहिद खान, माजी आमदार सुभाष झांबड, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ लीडर, महिला शहराध्यक्ष हेमलता पाटील, किरण पाटील डोणगावकर, पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल, रवींद्र काळे, मजहर पटेल, अतिश पितळे, पवन डोंगरे, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल, महाराष्ट्र सेवा दलाचे सचिव अनिल मानकापे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव ठोंबरे, शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, नीलेश पवार,तालुकाध्यक्ष कैलास उकिर्डे, संदीप काळे, गोविंद गायकवाड, मुसा पटेल, आलमनूर पठाण, अर्जुन ठोंबरे, सुमित निमगावकर, मनोज जैन, प्रियांका खरात, रघुनाथ म्हस्के, आदींची उपस्थिती होती. या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात बूथ व्यवस्थापन, प्रचार व प्रसार, नेतृत्व निर्माण, कॉंग्रेस पक्षाचे भारतीय विकासातील योगदान, शासकीय योजनांची माहिती, सोशल मिडिया चा प्रभावी वापर, कृषी धोरण, हाथ से हाथ जोडो अभियान, सामाजिक कार्य आदि विषयांवर राज्यभरातील सेवादलाच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून १४ जानेवारी रोजी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थिती होत आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे साधणार संवाद…
कॉंग्रेस सेवादलाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात शुक्रवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, दुपारी २ वाजता कार्याध्यक्ष बसवराज पाटील तर दुपारी तीन वाजता रत्नाकर महाजन हे मान्यवर शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार असून कॉंग्रेस सेवादलाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केले आहे.