श्री क्षेत्र वेरूळ येथे ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्टान च्या वतीने १५ नद्यांच्या जलाने १२५ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक

छत्रपती संभाजी नगर | वेरूळ येथील शहाजी महाराज स्मारक (गढी) परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य उत्सव मोठ्या थाटात पार पडला. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्टान च्या वतीने १५ नद्यांच्या जलाने १२५ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला.
या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतीकात्मक रूपाने पुनरावृत्ती करण्यात आली. या ऐतिहासिक दिवशी समस्त शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा देत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ.भागवत कराड, स्वराज्य संकल्पक प्रतिष्टान चे डॉ.राजेंद्र पवार, तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण “राज्याभिषेकाच्या जयघोषांनी” दुमदुमून गेले होते.