हॅप्पी फॅमिली हॉस्पिटलच्या मानसिक आजारावरील पुस्तकांचे आज प्रकाशन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ७
छत्रपती संभाजीनगर | आझाद चौकातील हॅप्पी फॅमिली हॉस्पिटलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजारावर लिहिलेल्या दोन पुस्तकाचे प्रकाशन आज शनिवारी (दि.७) रात्री आठ वाजता खा इम्तियाज जलील यांच्या हस्ते होणार आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित केलेल्या या प्रकाशन पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अजिज अहमद कादरी शोयब खुसरो, सकिब खुसरो, शारेक नक्शबंदी, मौलाना अब्दुल कदिर मदनी मौलाना, नसिउद्दीन मिफ्तही, मुक्ती नईम आणि मौलाना जुनैद हे उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्याची वेगवेगळे कारण असले तरी वेळेत उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतोय हॅप्पी फॅमिली हॉस्पिटलच्या डॉ सदा कादरी खिलजी आणि डॉ फैजल अहमद खिलजी यांनी मानसिक आरोग्य विषयी हम और हमारी नफसियाती सेहत हे उर्दू भाषेमधील पुस्तके लिहिली आहेत या पुस्तकांमध्ये मानसिक आजार त्याची कारणे आणि उपचार पद्धती यावर प्रकाश टाकण्यात आले आहे हे पुस्तक सर्व सर्वसामान्य नागरिकांना फारच मोलाचे ठरणार आहे हे पुस्तक उर्दू आणि इंग्रजी भाषेत असले तरी लवकरच मराठी भाषेतही प्रकाशित केले जाणार आहे पुस्तक प्रकाशन सोबतच मानसिक आजाराविषयी परिसंवाद ही आयोजित करण्यात आला आहे या परिसंवादामध्ये तज्ञ डॉ नागरिक व रुग्णांना मार्गदर्शन करणार आहे असे माहिती डॉ फैसल खिलजी व डॉ सना खिलजी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.