२१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळले ; जालन्याच्या बदनापूर तालूक्यातील मेहुणा गावातील घटना
घातपात असल्याचा नातेवाईकांचा संशय ; पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करत तपास कार्य वेगाने

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१०
जालना | जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मेहुणा या गावामधील गायरान जमिनीवर २१ वर्षीय आकाश जाधव याचा मृतदेह जळालेल्या रविवारी (दि.१०) अवस्थेत आढळला असून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत तपास कार्य वेगाने सुरु केले आहे. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शिनी पोलिसांना दिल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आपली तपास यंत्रणा जलद गतीने कामाला लावली असून या घटनेतील दोषी आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. आकाश चा मृत्यु नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
काय आहे घटना…
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार आकाश नेहमीप्रमाणे शनिवारी (दि.८) घराबाहेर झोपायला गेला होता. आज सकाळी त्याचे वडील बबनराव जाधव हे त्याला उठवण्यासाठी गेले असता. आकाश त्याच्या जागेवर नव्हता. या चिंतेने आकाश चे वडील शेजारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने आकाशला शोधण्यासाठी इतरत्र गेले असता ५०० मिटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यात आकाशचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकाशाची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा शोध घेत तपास जलद गतीने सुरु केला. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपासणीसाठी आकाशचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून आकाशचा घातपात करणाऱ्या दोषी आरोपीवर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी मयत आकाशच्या नातेवाईकांनी केली आहे.