शिवसेना फुलंब्री विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उद्घाटन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.११
छत्रपती संभाजी नगर | शिवसेनेचे फुलंब्री विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांच्या गारखेडा परिसर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा जिल्हाप्रमुख डॉ. अंबादास दानवे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख राजू राठोड ,जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप, माजी महापौर कला ओझा, विधानसभा संघटक दुर्गाताई भाटी , राज्यसंघटक चेतन कांबळे ,तालुकाप्रमुख सोमीनाथ करपे ,शंकर ठोंबरे उपजिल्हाप्रमुख संतोषजी जेजुरकर ,जगन्नाथ पवार तालुका संघटक अमित वाहुळ, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, संतोष खेंडके, मा.सभागृहनेता गजानन मनगटे, नगरसेवक आत्माराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व सामान्य जनतेची काम करण्याचे संपर्क कार्यालय हे केंद्रबिंदू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन करताना आपण पक्ष बळकट करत असताना जनसामान्याचे काम या संपर्क कार्यालयातून करण्यात यावे. भविष्यात फुलंब्री मतदारसंघावरही उत्कृष्ट काम करून आपण सर्व मिळून शिवसेनेचा भगवा फडकू शकतो अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.
संघटना वाढीवर भर द्यावा – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांनी बोलताना संघटना कशा पद्धतीने जास्तीत जास्त वाढवण्यात यावी, याच्याकडे आपण भर देऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करावे असा सल्ला सुद्धा विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांना खैरे साहेबांनी दिला त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन करताना विधानसभा संघटक खेडकर यांनी सर्वांचे आभार मानले व या कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास साठी आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही देउन आभार मानले.
याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ ,मच्छिंद्र देवकर, हनुमान शिंदे, तसेच जिल्हा युवा युवती अधिकारी पुजा कायंदे, महिला आघाडी सुकन्या भोसले, अंजली मांडवकर ,मंजुषा नागरे,सुनंदा खरात, राजश्री पोफले,पोलीस अधिकारी उगले , शाहूराज चित्ते, उपशहर प्रमुख लक्ष्मण पिवळ, विभाग प्रमुख भाऊसाहेब राते,उपशहर प्रमुख आयुब पटेल, उपतालुकाप्रमुख गोविंद लहाने ,श्रीराम मस्के, राधाकिसन कोलते पाटील ,दीपक कणसे,तालुका युवा अधिकारी राजू तायडे, दिपक लेंभे , विभागप्रमुख गोविंद पांडेजी ,योगेश शिरसाठ,सूरज सोनवणे, शांतिनाथ जैन, संतोष कापडे ,सुशील जयस्वाल, पांडुरंग फुके,विश्वनाथ त्रिभुवन ,गंगाधर सोनोने गणेश मुळे, प्रभाकर भालेराव ,प्रभाकर कसारे ,नवाब शेख चांद पठान अब्बास कुरैशी ,विजय वाई,संदीप कसारे ,पोपटराव कसारे ,राजु कसारे ,संजय कसारे ,शकूर शेख ईनस, शेक जुबेर मलिक ,आनिल भालेराव नाना भालेराव,दिलावर शेख ,सुनील कसारे ,रवि कसारे, सतीश कसारे, आबास शेक,नाजिम रफीक शेक आयमद शेक,कोयल साबैर,बंटी गंगावणे ,जिजा पवार, विष्णू गुंठाळ, संजय कोरडे, संदीप बारगळ, राजू चव्हाण, ईश्वर शिंदे ,बापू कवळे, प्रशांत कुरे, आमिर शेख, पवन गायकवाड, संतोष तांबे , अनिकेत उकिरडे पाटील , पराग कोयाळकर, पियुष कोयाळकरआयुपाल खांडेकर, सुनील राठोड , राऊफ सौदागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.