जिल्हा शिवजंयती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन भागवत कराड यांची निवड

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ३१  

छत्रपती संभाजीनगर | जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आगामी शिवजयंती निमित्ताने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुढील नियोजनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)  जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या २०२२-२०२३  वर्षाच्या अध्यक्ष पदी हर्षवर्धन भागवत कराड यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. अ गेल्या ५३ वर्षाची सर्व धर्मीय व पक्षीय परंपरा याही वर्षी विचारात घेऊन सदर निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी बैठकीत वर्ष २०२१- २०२२ चा कार्य वृत्तांत सादर केला. अध्यक्ष पदाचे नाव मावळते अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी सुचवले तर उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यास अनुमोदन देऊन मान्यता दिली. शिवजयंती निमित्ताने  विवीध उपक्रम व कार्यक्रम राबवण्याची सुचना मान्यवरांनी मांडली. लवकरच सर्व राजकीय पक्ष, सामाजीक संघटना, अराजकीय संघटना, महिला संघटना या सह विविध स्तरातील कार्यकर्ते व शिवप्रेमींचा समावेश असणारी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती औरंगाबाद   (छत्रपती संभाजी नगर ) ची सर्व समावेशक कार्यकारीणी निवड होणार असुन ती निवडण्याचे अधिकार संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार आणि नवनिर्वाचीत अध्यक्ष हर्षवर्धन भागवत कराड यांना बैठकीत सर्वनुमाते बहाल करण्यात आले .

बैठकीस संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, तनसुख झाम्बड, विजय औताडे, राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, राजेंद्र  जंजाळ, अभिषेक देशमुख, अनिल पाटील मानकापे, प्रा.मनोज पाटील, राजु शिंदे, राजेंद्र दानवे,राजेंद्र पारगावंकर, बाळासाहेब औताडे, अनिल बोरसे, अनिकेत पवार, संदीप शेळके, हरीष शिंदे, विशाल दाभाडे, प्रशांत शेळके, संदीप चव्हाण यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक  राजेंद्र दाते पाटील यांनी केल तर उपस्थितांचे आभार प्रा. मनोज पाटील यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!