जिजाऊ चौकात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले अभिवादन ; राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव महोत्सव समितीच्या वतीने थाटात साजरा

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १२
छत्रपती संभाजीनगर | जिल्हा जिजाजिऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाच्या पूर्व संध्येला जिजाऊ चौकात समितीच्या वतीने दीपोत्सव, पाळणा, पोवाडा तसेच मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी गुरुवारी (दि.१२) अभिवादन करण्यात आले. जिजाऊ चौकात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जिजाऊ जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील यांनी दिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष विकीराजे पाटील, संस्थापक कार्याध्यक्ष राजीव थिटे पाटील तथा उत्सव समीतीच्या दिपाली जाधव , हेमा पाटील सहपदाधिकारी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथे अभिवादन करण्यात आले माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरीभाऊजी बागडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के जाधव, तथा विवीध संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. समीतीतर्फे रक्तदान शिबीर, फळ वाटप, ढोलवादन,यासह विवीध कार्यक्रम घेण्यात आले. अभिवादन कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत लहान विद्यार्थिनीनी आपला सहभाग नोंदवून उपस्थितांचे लक्ष वेधले.