डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान कोणीही बदलू शकत नाही ; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २४ :
छत्रपती संभाजीनगर | काँग्रेस ने आपल्या देशात अनेक वेळा संविधान बदलले आहे. मात्र भाजप संविधान बदलत असल्याचा चुकीचा गैरसमज देशात पसरवत आहे. असा खोटा प्रचार करणाऱ्या व्यक्तींना समाजाने त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी केले. शहरात आयोजित करण्यात आलेल्या संविधान जागर यात्रा निमित्त ते बोलत होते. शुक्रवारी (दि.२३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही यात्रा काढण्यात आली. पुढे राजश्री शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करत एन 7 मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जाहीर सभा घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
राज्यात 9 ऑगस्ट पासून ते 8 सप्टेंबर या कालावधीत ही जागर यात्रा सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर पर्यंत काढण्यात येत आहे. यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा बदल संविधानामध्ये करायचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून कुठल्या प्रकारचे संविधानामध्ये बदल होणार नाही असे मंत्री श्री अतुल सावे म्हणाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, काँग्रेसची ही पद्धतच आहे दरवेळेस निगेटिव्ह काहीतरी बोलायचं आणि समाजामध्ये गैरसमज निर्माण करून मते मिळवायची मात्र हा त्यांचा गैरसमज आपल्या सगळ्यांना मिळून दूर करावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. देशात संविधानाचे 75 वर्ष साजरा करत आहे. लोकसभेच्या दरम्यान भाजप संविधान बदलणार, लोकशाही नष्ट करणार, हिंदू राष्ट्राची स्थापना करणार आणि भारताचा हिंदुस्थान होणार अशा अनेक निराधार गोष्टी सर्व संविधान प्रेमी समाज समूहांना गुमराह करण्याचे आटोकाट प्रयत्न विरोधी पक्षांकडून करण्यात आली. कांग्रेस ने नेहमीच वंचित शोषितांचे आणि अनुसूचित जाती जमाती समाजातील नागरिकांना नेहमीच विकासापासून दूर ठेवत समाजाला अंधारात ठेवले, त्यामुळे नागरिकांनी विरोधी पक्ष पसरवत असलेल्या खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये तसेच काळाची पाऊले ओळखून समाजाने भाजपला विरोध करणे सोडावे असा सूर या संविधान जागर यात्रे दरम्यान वक्त्यांनी उमटवत काँग्रेस पासून सावध राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. लक्ष्मीकांत थेठे, जालिंदर शेंडगे, माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे, विधिज्ञ् वाल्मिक निकाळजे, रवी एडके, राजेंद्र गायकवाड, नितीन मोरे, योगेश दणके, राजू खाजेकर, उत्तम कांबळे, गौतम साळवे, यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.