श्री नर्मदेश्वर संस्थान च्या वतीने आज महाशिवरात्री महोत्सव
प्रख्यात गायक प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे याच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम

श्री नर्मदेश्वर संस्थान च्या वतीने आज महाशिवरात्री महोत्सव
*छत्रपती संभाजी नगर | दि. २५ :* महाशिवरात्री निमित्ताने एन -१, सिडको येथील श्री नर्मदेश्वर संस्थान च्या वतीने बुधवारी (दि. २६) भव्य “महाशिवरात्री महोत्सव” सायंकाळी ७ वाजता आयोजीत करण्यात आल्याची माहिती श्री नर्मदेश्वर संस्थांन मित्र मंडळाचे राजेंद्र शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
श्री नर्मदेश्वर संस्थांन मित्र मंडळाच्या वतीने एन -१, सिडको येथील श्री नर्मदेश्वर संस्थानच्या महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रख्यात गायक प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे याच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हर हर महादेवाचा जयघोष करत नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन श्री नर्मदेश्वर संस्थांन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.