व्हॅलेंटाईन डे च्या अगोदरच बहरणार प्रेमी युगुलांसाठी “रुह”
अभिनेते विशाल राठोड (लाला) आणि अभिनेत्री रितिका बागडे यांची प्रमुख भूमिका असलेले "रुह" हे सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सचिन लिला सुखदेव अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | दि. ४ :* प्रेमाची निरागस भावना आणि त्यातून बहरणारे प्रत्येक रोमँटिक क्षण या व्हॅलेंटाईन डे च्या अगोदरच बहरणार असून प्रेमी युगुलांसाठी लाला फिल्म अँड इंटरटेनमेंट यांची निर्मिती व अभिनेते विशाल राठोड (लाला) आणि अभिनेत्री रितिका बागडे यांची प्रमुख भूमिका असलेले “रुह” हे सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “ऐसी ये रात हो, के उसे ना हूर हो” या भावस्पर्शी गीतातून त्यांचा रोमँटिक अभिनय प्रत्येकाला प्रेमात पडायला लावणार असाच आहे.
स्वप्नील प्रीत यांच्या शब्दांना ए.के. नलावडे यांनी स्वतः च संगीतबद्ध करून हे गीत गाऊन तरुण मनाला नव्हे त्यांच्या “रूह” (आत्मा) ला साद घातली आहे. मंद दिव्यांच्या प्रकाशात एका चित्रकाराने आपल्या प्रेयसीला घातलेली साद आणि या प्रेमातून रंगणारे विविध रोमँटिक क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या रूह ला नक्कीच स्पर्श करतील हे अभिनेते विशाल राठोड (लाला) आणि अभिनेत्री रितिका बागडे यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द, संगीत आणि अभिनय हा तरुण मनाच्या काळजाचा ठाव घेणारी आहे. गौरव कोरगांवकार यांनी संगीत संयोजन करून वरद कठापूरकर यांनी आपल्या सुंदर बासरीची मोरपंखी किमया या गीतातून केली आहे.
ईशान देवस्थळी व ऋषिकेश धर्माधिकारी यांच्या ध्वनी व्यवस्थेमुळे हे गीत अधिकच रोमँटिक होत प्रत्येकाला आपल्या प्रेमाचा फील देऊन “रूह” ला स्पर्श करेल हे नक्कीच. त्यामुळे प्रेमाची निरागस भावना आणि त्यातून बहरणारे प्रत्येक रोमँटिक क्षण या व्हॅलेंटाईन डे च्या अगोदरच तरुणाईने नक्की “रूह” या गाण्यातून अनुभवा अशी साद अभिनेते विशाल राठोड (लाला) यांनी आपल्या या नव्या रोमँटिक सॉंग च्या माध्यमातून संपूर्ण तरुणाईला घातली आहे.