शिवराज राक्षे ठरला यंदाचा महराष्ट्र केसरी ; मानाची चांदीची गदा पटकावल्याने चाहत्यांचा जल्लोष

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १४     

पुणे | कुस्तीपटू शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरल्याने राज्यभरातील कुस्तीपटू मध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या थरारक अंतिम सामन्यात शिवराजने प्रतिस्पर्धी असलेला महेंद्र गायकवाड ला चीतपट करून महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवराज राक्षे ला मानाची चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आल्याने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शनिवारी (दि.१४) पुण्यात झालेल्या या अंतिम सामन्यात शिवराज ला ५ लाख रुपये बक्षीस व महिंद्राची थार हि गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

उपविजेता ठरलेला महेंद्र गायकवाडला या कुस्ती स्पर्धेत रोख अडीच लाख रुपये व ट्रक्टर बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र भरातून कुस्तीपटू सहभागी झाले होते. गेल्या १२ वर्षापासून मी या स्पर्धेसाठी तपस्चर्या करत होतो, आणि याचे फळ आज मला मिळाले. अशी भावना त्याने व्यक्त करत आता मला औलम्पिक ची तयारी करायची असून तेच माझे यापुढील ध्येय असल्याचे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे म्हणाला. माझ्या आई वडिलांची आणि भाऊ मित्र परिवार यासह माझे गुरु वस्ताद, शरद पवार यांच्यामुळे मला महाराष्ट्र केसरी चा बहुमान पटकावता आला असे शिवराज म्हणाला.

तमाम कुस्तीपटू च्या मानधनात वाढ करून त्यांना शासकीय सेवेत नौकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ६ हजार रुपयावरून यापुढील मानधन आता २० हजारावर देण्याचा निर्णय यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केला. तीनपट मानधन देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!