बिसेफ तर्फे रविवारी गुणवंतांचा सत्कार ; सोहळ्यास उपस्थित राहण्याचे बिसेफ तर्फेआवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २३
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिसेफ च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बहुजन समाज कर्मचारी संघाच्या वतीने रविवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता सिडकोतील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात दहावी व बारावी परीक्षेत ८० ते ९० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या सन्मान सोहळ्यास उपस्थित आवाहन बिसेफ तर्फे करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश चौथाईवाले, विधीज्ञ दयानंद भांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष वैरागड यांची तर सुभाष वैरागड, बालाजी वाघमारे, द्रौपदी कदम, रुपाली कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल. बिसेफ चे राज्य सचिव माधव सानेकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी नगर चे बिसेफ अध्यक्ष समर्थ रोडे यांची उपस्थिती असेल.