भारताच्या जडण-घडणीत काँग्रेसचे मोठे योगदान ; माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मत ; कॉंग्रेस सेवादलच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १४     

छत्रपती संभाजीनगर |: गेल्या ७० वर्षात कॉँग्रेसने काय केले? असा आरोप आणि टीका विरोधक करत राहतात. यावर कॉंग्रेसच्या पूर्वजाना विचारा की आम्ही काय केले. असे प्रत्युत्तर देत भारताच्या जडणघडणीत कॉँग्रेसने चे मोठे योगदान असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त करत विरोधकांवर तोफ डागली. कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने कुंभेफळ येथे आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण समारोपाप्रसंगी शनिवारी (दि.१४)  ते बोलत होते.

 याप्रसंगी व्यासपीठावर पश्चिम विभागाचे समन्वयक तथा कॉंग्रेस सेवा दलाचे सचिव चंद्रप्रकाश वाजपेयी, अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव लालजी मिश्रा, कॉंग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आमदार केशवराव औताडे, प्रकाश मुगदिया, माजी आमदार नामदेवराव पवार, माजी मंत्री अनिल पटेल, रवींद्र काळे, संदीप बोरसे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, सुरेंद्र साळुंखे, मजहर खान, मोहित जाधव, निमेश पटेल, अरुण शिरसाट, कांचन कुमार चाटे, प्रभाकर मुठे, अनिल माळोदे, वरून पाथ्रीकर  आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये ज्वलंत विषय आहेत.आणि यामधे कॉंग्रेस सेवा दलाची भूमिका  हि कर्तुत्वाची, काम करण्याची मेहनतीची आहे. देश का, महाराष्ट्र का सही बल सेवा दल असून कॉंग्रेस ने केलेल्या ७० वर्षातील कामगिरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. तीन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आयपीएल मॅच मध्ये सुरुवातीचा बॅट्समन महत्वाचा असतो त्यामुळे सुरुवात चांगली झाली तर शेवटची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असते अशी कोपरखळीही चव्हाण यांनी यावेळी काढली.या प्रशिक्षण शिबिरात माजी आमदार रामहरी रुपनवर, अमर खानापूरकर रत्नाकर महाजन, कृषी तज्ञ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनीही मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र सेवा दलाचे सचिव अनिल मानकापे, मनीष नेमाडे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव ठोंबरे, शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, नीलेश पवार,तालुकाध्यक्ष कैलास उकिर्डे, संदीप काळे, गोविंद गायकवाड, मुसा पटेल, आलमनूर पठाण, अर्जुन ठोंबरे, सुमित निमगावकर, मनोज जैन, प्रियांका खरात, रघुनाथ म्हस्के, शकील शहा, सुरेश पवार, विकास घाळ, अक्षय घाळ, मुनीर पटेल, सावता गाडेकर, परमेश्वर उकिरडे, लता साळवे, दानिश लांबा, संतोष शेजवळ, भगवान गोजे, परमेश्वर पळसकर, अमर जगतापअजय गांधले यांनी पुढाकार घेतला. या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात बूथ व्यवस्थापन, प्रचार व प्रसार, नेतृत्व निर्माण, कॉंग्रेस पक्षाचे भारतीय विकासातील योगदान, शासकीय योजनांची माहिती, सोशल मिडिया चा प्रभावी वापर, कृषी धोरण, हाथ से हाथ जोडो अभियान, सामाजिक कार्य आदि विषयांवर राज्यभरातील सेवादलाच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!